रणजी विजेता विदर्भासमोर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या शेष भारत संघाचे आव्हान

१९५९-६० मध्ये रणजी चषकाला २५ वर्ष पूर्ण झाली होती आणि इराणी चषक हा रणजी विजेता संघ विरुद्ध उर्वरित भारतीय संघामध्ये खेळवण्यात येतो. आता पर्यंत झालेल्या इराणी चषकात शेष भारत संघाने सर्वाधिक २७ वेळेस त्यानंतर रणजी चषकाचा बादशहा मुंबईने १४ वेळेस इराणी चषकावर आपले नाव कोरले. २०१७-१८ चा रणजी विजेता विदर्भने पहिल्या डावाच्या आघाडीवर विदर्भने शेष भारतावर विजय मिळवला. एकाच सत्रात रणजी चषक आणि इराणी चषक जिंकत विदर्भने कौतुकास्पद कामगिरी केली.

२०१७-१८ च्या सत्राप्रमाणेच विदर्भाने २०१८-१९ च्या अंतिम सामन्यांत सौराष्ट्राचा ७८ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा रणजी चषकावर आपले नाव कोरले. सलग दोन सत्रात रणजी चषक जिंकणारा विदर्भाचा संघ, मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, राजस्थाननंतर ६ वा संघ ठरला. विदर्भाचा संघ पूर्ण सत्रात अपराजित राहिला यावरुन त्यांचा संघातील समतोल दिसुन येतो. अनुभवी खेळांडु बरोबरच युवा खेळाडुंनी विदर्भासाठी महत्त्वाची भुमिका निभावली.

      सलग दुसऱ्यांदा रणजी चषक जिंकल्यामुळे फैज फजलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या विदर्भाचा संघ आत्मविश्वासाने भरलेला असेल यात शंका नसेल पण या रणजी विजेता संघाचा सामना असेल तो अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या शेष भारत संघाशी. शेष भारत संघात कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, इशान किशन, मयंक अगरवाल या तगड्या फलंदाजां पाठोपाठ अंकित राजपुत, धर्मेंद्रसिंग जडेजा, संदिप वॉरियर आणि राहुल चहर या गोलंदाजांचा समावेश शेष भारत संघात केला आहे. त्यामुळे सामना अतितटीचा होईल यात शंकाच नाही. काहीच दिवसांत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड होईल त्यामुळे रहाणे, अय्यर, मयंक आणि उमेश यादव कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील असतील यासोबतच रजनिश गुर्बानी, अंकित राजपुत आणि संदिप वॉरियरच्या कामगिरीवरही निवड समितीचे लक्ष असेल.

संघ पुढीलप्रमाणे:

विदर्भ: फैज फजल (कर्णधार), वासिम जाफर, उमेश यादव, सुनिकेत बिंगेवार, रजनिश गुर्बानी, गणेश सतीश, मोहीत काळे, अक्षय कर्नेवार, ललित यादव, अक्षय कोल्हार, दर्शन नालकंदे, संजय रघुनाथ, आदित्य सरवटे, अर्थव तायडे, आदित्य ठाकरे, अक्षय वाडकर, यश ठाकुर, अक्षय वखारे

शेष भारत: अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अगरवाल, अनमोलप्रित सिंग, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, इशान किशन, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, धर्मेंद्रसिंग जडेजा, रोनित मोरे, स्नेल पटेल, अंकित राजपुत, संदिप वॉरियर, रिंकु सिंग, तन्विर उल-हक

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *