विदर्भच्या पोट्यांचा सलग दुसऱ्यांदा रणजी करंडकावर कब्जा, आदित्य सरवटे ठरला सामनावीर

नागपुरमध्ये होत असलेल्या रणजी २०१८-१९ च्या अंतिम सामन्यांत विदर्भने पहिल्या डावात ५ धावांची आघाडी घेतली होती आणि तीसऱ्या दिवसअखेर सामना बरोबरीत होता. त्यामुळे दोन्ही संघाना विजयाची संधी होती. विदर्भने दुसऱ्या डावाची सुरुवात सावध केली होती. पण विदर्भची अवस्था ५ बाद ७३ झाली होती आणि सौराष्ट्रने सामन्यांवर पकड मिळवली असेच दिसत होते. मोहित काळेनी आधी अक्षय कर्नेवरसोबत ६ व्या गड्यासाठी ३२ धावांची तर आदित्य सरवटेसोबत ७ व्या गड्यासाठी २९ धावांची भागिदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

      मोहित काळे ३८ धावांवर बाद झाला तेव्हा विदर्भने ७ गडी गमवत १३४ धावा केल्या होत्या त्यामुळे शेवटचे फलंदाज किती धावांची भर घालतात हे पाहणे महत्त्वाचे होते. मोहित बाद झाल्यानंतरही आदित्य सरवटेनी एक बाजू लावुन धरली होती. आदित्यनी उमेश यादवसोबत ९ व्या गड्यासाठी ३१ धावांची भागीदारी करत विदर्भची धावसंख्या २०० च्या जवळ नेऊन ठेवली होती. शेवटी विदर्भचा दुसरा डाव २०० धावांत संपुष्टात आला आणि सौराष्ट्रच्या संघापुढे २०६ धावांच आव्हान ठेवले. विदर्भकडुन आदित्य सरवटेनी सर्वाधिक ४९ धावा केल्या तर सौराष्ट्रकडुन धरमेंद्रसिंग जडेजाने सर्वाधिक ६ गडी बाद केले आणि त्याला मकवाना, उनाडकट आणि सकारीयाने चांगली साथ दिली.

      २०६ धावांच आव्हान तसं मोठं नव्हंत आणि सामन्यांचे ४ सत्र बाकी होते. छोटं आव्हानाच संघाला अडचणीत आणत असतात त्यामुळे दोन्ही संघ कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष्य होते. विदर्भचा कर्णधार फैज फजलने सर्वांना धक्का देत आदित्य सरवटेकडुन गोलंदाजीची सुरुवात केली. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत आदित्यने ७ व्या षटकांत पहिल्या डावात शतकवीर स्नेल पटेलला बाद करत सौराष्ट्रच्या संघाला मोठा धक्का दिला. त्यानंतर ९ व्या षटकांत हार्विक देसाई आणि चेतेश्वर पुजारा बाद करत आदित्यने सौराष्ट्रची अवस्था ३ बाद २२ केली होती आणि बघता बघता सौराष्ट्रचा डाव गडगडला.

      विश्वराज जडेजाने एक बाजू लावुन धरली होती पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. अर्धशतक झळकावल्यानंतर विश्वराज ५२ धावांवर बाद झाला आणि सौराष्ट्रचा डाव फक्त १२७ संपुष्टात आला. सौराष्टकडुन विश्वराज जडेजाने सर्वाधिक ५२ धावा केल्या. विदर्भकडुन आदित्य सरवटेनी सर्वाधिक ६ गडी बाद केले आणि अक्षय वखारे व उमेश यादवने त्याला उत्तम साथ दिली. सौराष्ट्रचा ७८ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी विदर्भने रणजी करंडकावर कब्जा केला. सलग दोन वर्षी रणजी चषक जिंकण्याची किमया यापुर्वी मुंबई, महाराष्ट्र, बडोदा, दिल्ली, कर्नाटक आणि राजस्थानने केली आहे. सामन्यांत ४९ धावा आणि ११ गडी बाद अशी अष्टपैलु कामगिरी केलेल्या आदित्य सरवटेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

रणजी चषक २०१८-१९

संघाच्या सर्वाधिक धावा – मेघालय ८२६/७ डाव घोषीत वि. सिक्कीम

निच्चांकी धावसंख्या त्रिपुरा ३५ वि. राजस्थान

सर्वाधिक धावा – मिलींद कुमार (सिक्कीम) १३३१ धावा

सर्वाधिक बळी – आशुतोष अमन (बिहार) ६८ बळी

सर्वोच्च धावा – पुनित बिष्ट (मेघालय) ३४३ धावा

सर्वाधिक शतक – मिलींद कुमार (सिक्कीम) ६ शतके

सर्वात मोठी भागिदारी – राज बिसवा व पुनित बिष्ट (मेघालय) ४३३ धावा वि. सिक्कीम

एका डावात सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण – जलज सक्सेना (केरळ) ८/४५ वि. आंध्र प्रदेश

सामन्यांत सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे पृथ्थकरण – सौरभ कुमार (उत्तर प्रदेश) १४/६५ वि. हरियाणा

सर्वाधिक झेल व यष्टिचीत – चेतन बिष्ट (राजस्थान) ४९ झेल ० यष्टिचीत

सर्वाधिक झेल – हार्विक देसाई (सौराष्ट्र) २१ झेल

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *