भाई व्यक्ती की वल्ली (उत्तरार्ध)

अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या पु.ल.देशपांडे या एका अवलिया माणसाची जीवनकथा पूर्वाधात अनुभवल्यानंतर उत्तरार्धात त्यांच्या अजून काही घटनांचा आलेख अनुभवण्याचं भाग्य प्रेक्षकांना लाभणार आहे. विज्ञानाची खरंच का कृपादृष्टी असती तर हेच भाई अजून बरीच वर्ष रसिकांच्या मनावर राज्य करत असते. भाई होणे नाही हेय मात्र खर.

पुलं म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न कायम राहतो. त्यांनी आयुष्यात काही यशस्वी नाटके केली, दूरदर्शनमध्ये नोकरी केली, मुक्तांगणला नाव आणि निधी दिला आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर काही दिवसांनी आजारपणाने गेले हे त्यांचे आयुष्य एका बाजूला पडद्यावर पाहिल्यावर आपण जे पुलं वाचले, ते कोणी दुसरेच होते की काय असे वाटत राहते. 

भाईंच्या दूरदर्शनाच्या नोकरीपासून त्यांच्या राजीनाम्यापर्यंत आणि मराठी रंगभूमीवर बटाट्याची चाळ साकारण्यापासून अद्भुत मराठी नाटकं प्रेक्षकांना देनात वेळ पुढे जाते . या प्रवासात सुनिताबाईंनी भाईंना दिलेली साथ आणि त्याचवेळी प्रेअक्षकांचा मनावर राज्य करणारे भाई , आनंदवन,मुक्तांगण अश्या गोष्टींना मोकळय हाताने मदत करणारे भाई, आणि आणीबाणीच्या काळात विचारस्वातंत्र्यांचा पुरस्कार करणारे भाई हे कित्येक गोष्टी सिनेमात एकामागोमाग एक येत असतात. यादरम्यान त्यांच्या आयुष्यात आलेली दत्तारामपासून ते भक्ती बर्वे आणि आचार्य अत्रे, विजय तेंडुलकर ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंतची झंझावती व्यक्तिमत्वं या दरम्यान आपल्याला समजत जातात. त्यामुळे पूर्वाधापेक्षा सिनेमाचा उत्तरार्ध जास्त उत्तेजक आणि वेगवान वाटतो. 

    पूर्वाधात भाईंची आणि सुनिताबाईंची भूमिका साकारणारे सागर देशमुख आणि इरावती हर्षे ह्या भागातही आपलं काम तितकंच चोख करतात, वृध्दापकाळातील विजय केंकरे आणि शुभांगी दामले यांनी साकारलेली भाई आणि सुनिताबाईंची पात्रेही सुंदर झाली आहेत. विजया मेहता यांच्या तरूणपणातील आणि वृध्दापकाळातील भूमिका साकारणाºया अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि नीना कुलकर्णी यांनी विजयाबाईंना फार सुंदर साकारली आहे. बाबा आमटेंची भूमिका करणारे संजय खापरेचं आणि बाळासाहेब ठाकरेंची भूमिका करणारे सारंग साठे यांनी छोट्या भूमिकांन मधेही कमाल केली आहे. 

पूर्वाधात सिनेमाच्या संगीताने खरंच जान आणली होती. उत्तरार्धातही नाच रे मोरा आंब्याच्या वनात आणि दिग्गजांची पुन्हा रंगलेली अलौलिक मैफिल कानाला तृप्त करते. आणि ही मेजवानी संगीतमय स्वरूपात पुन्हा अनुभव करून देण्यासाठी संगीतकार अजित परब यांची मेहनत दिसते. 

पु.ल यांना अनुभवण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवाच!

निर्माता : महेश मांजरेकर

दिग्दर्शक : महेश मांजरेकर, 

पटकथा : गणेश मतकरी, 

संवाद : रत्नाकर मतकरी, 

संगीत : अजित परब 

संकलन : अभिजीत देशपांडे 

कला निर्देशन : प्रशांत राणे 

छायाचित्रण : करण रावत 

रंगभूषा : विक्रम गायकवाड 

कलाकार : सागर देशमुख,इरावती हर्षे,विजय केंकरे,नीना कुलकर्णी व अन्य

या सिनेमाला अमी देतोय :४.५/५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *