रेल्वे स्थानकांच्या नावाच्या शेवटी का लिहलेलं असत जंक्शन, टर्मिनल आणि सेन्ट्रल, तुम्हाला माहित आहे का ?..

जर कुठल्या रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी टर्मिनल लिहिले असेल तर त्याचा अर्थ तिथून पुढे ट्रॅक नाही. म्हणजे रेल्वे ज्या दिशेने आली त्याच दिशेने परत जाणार. टर्मिनसला टर्मिनल पण म्हटले जाते. म्हणजे असे स्टेशन जिथून रेल्वे पुढे न जाता आली त्याच दिशेने परत जाते. आपल्या माहितीसाठी देशात सध्या 27 स्टेशनवर टर्मिनल लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस हे देशातील सगळ्यात मोठे टर्मिनल आहेत.

स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेले असले तर त्या शहरात एक पेक्षा अधिक स्टेशन आहेत. ज्या रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेले असते ते त्या शहरातील सगळ्यात जुने स्टेशन असते. रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेलं असण्याचा दुसरा अर्थ असा की ते त्या शहरातील सगळ्यात व्यस्त राहणारे स्टेशन आहे. तुमच्या माहितीसाठी सध्या भारतात मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल, त्रिवेंद्रम सेंट्रल, मंगलोर सेंट्रल, कानपुर सेंट्रल हे प्रमुख सेंट्रल स्टेशन आहेत.

 कुठल्याही स्टेशनच्या नावाच्या शेवटी जंक्शन लिहिलेले असणे म्हणजे त्या स्टेशनवर येण्या जाण्यासाठी 3 पेक्षा अधिक मार्ग आहेत. म्हणजे ट्रेन एका मार्गाने येऊन त्या स्टेशन वरून इतर दोन मार्गावरून जाऊ शकते. त्यामुळे स्टेशनच्या नावाच्या शेवटी जंक्शन लिहिलेले असते. सध्या देशात मथुरा जंक्शन (7 रुट्स), सालेम जंक्शन (6 रुट्स), विजयवाड़ा जंक्शन (5 रुट्स ), बरैली जंक्शन (5 रुट्स) हे जंक्शन स्टेशन आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *