आयसीसी पुरस्कारामध्येही विराटच अव्वल!!!

रिषभ पंत ठरला उद्योन्मुख खेळाडु

२०१८ साल भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे ठरले. २०१८ ची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवाने झाल्यानंतर भारताने आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका ५-१ ने जिंकली. इंग्लडविरुद्धच्या कसोटी मालिकेबरोबरच एकदिवसीय मालिकेतील पराभव भारताच्या जिव्हाळी लागला होता. २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळताना भारताने ६ कसोटी विजय मिळवले तर वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकली. तर इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका वगळता २०१८ मध्ये खेळलेल्या सर्व मालिका भारताने जिंकल्या त्यात वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि आशिया चषकचा समावेश होता. कर्णधार पदासोबतच फलंदाजीत विराट कोहलीने २०१८ मध्ये १३ कसोटीत ५ शतके ५ अर्धशतकांच्या सहाय्याने १३२२ धावा काढल्या. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात सपशेल अपयशी ठरल्यानंतर २०१८ च्या दौऱ्यात ५ कसोटीत २ शतके ३ अर्धशतकांच्या सहाय्याने ५९.३० च्या सहाय्याने ५९३ धावा काढल्या. तर कोहलीने २०१८ मध्ये खेळलेल्या १४ एकदिवसीय सामन्यांत ६ शतके व ३ अर्धशतकांच्या सहाय्याने १२०२ धावा काढल्या.

२००४ पासून सुरु झालेल्या आयसीसी पुरस्कारात भारताकडुन राहुल द्रविड (२००४), सचिन तेंडुलकर (२०१०), रविचंद्रन अश्विन (२०१६) आणि विराट कोहली (२०१७) ने “क्रिकेटर ऑफ दि इयर” चा पुरस्कार पटकावला आहे. राहुल द्रविड (२००४), गौतम गंभीर (२००९), विरेंद्र सेहवाग (२०१०). रविचंद्रन अश्विन (२०१६) ने कसोटीतील सर्वोत्तम खेळाडुचा तर महेंद्रसिंग धोनी (२००८ आणि २००९) आणि विराट कोहली (२०१२ आणि २०१७) ने प्रत्येकी दोनदा वन डे तील सर्वोत्तम खेळाडुचा पुरस्कार पटकावला आहे. पण विराट कोहलीने २०१८ च्या कामगिरीवर सर्वोत्तम खेळाडु, वन डे तील सर्वोत्तम खेळाडु आणि कसोटीतील सर्वोत्तम खेळाडु असे तीनही पुरस्कार पटकावणारा विराट कोहली आयसीसी पुरस्कारांच्या १५ वर्षांच्या इतिहासातील पहिला खेळाडु ठरला. या तीन पुरस्कारांसोबतच विराट कोहलीची २०१८ सालच्या वन डे सोबतच कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

२०१८ च्या इंग्लंड दौऱ्यात कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतने उद्योन्मुख खेळाडुचा पुरस्कार पटकावला. रिषभ पंत इंग्लडमध्ये शतक झळकावणारा भारताचा पहिला यष्टिरक्षक ठरला. उद्योन्मुख खेळाडुचा पुरस्कार पटकावणारा रिषभ पंत, इरफान पठाण (२००४) आणि चेतेशवर पुजारा (२०१३) नंतर भारताचा तिसरा खेळाडु ठरला. स्मृती मंधनाने “महिला क्रिकेटर ऑफ द इयर” आणि “महिला वन डे क्रिकेटर ऑफ द इयर” चा पुरस्कार आपल्या नावे केला.

आयसीसी पुरस्कार २०१८

क्रिकेटर ऑफ द इयर:- विराट कोहली (भारत)

कसोटीतील सर्वोत्तम खेळाडु:- विराट कोहली (भारत)

एकदिवसीयतील सर्वोत्तम खेळाडु:- विराट कोहली (भारत)

टी-२० तील सर्वोत्तम खेळाडु:- एरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया)

उद्योन्मुख खेळाडु:- रिषभ पंत (भारत)

सर्वोत्तम पंच:- कुमार धर्मसेना (श्रीलंका)

वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडु:- स्मृती मंधना (भारत)

एकदिवसीयतील सर्वोत्तम महिला खेळाडु:- स्मृती मंधना (भारत)

टी-२० तील सर्वोत्तम महिला खेळाडु:- अलिसा हिली (ऑस्ट्रेलिया)

आयसीसी कसोटी संघ:- विराट कोहली (भारत, कर्णधार), टॉम लेथम (न्युझिलंड), दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका), केन विलियमसन (न्युझिलंड), हेनरी निकोल्स (न्युझिलंड), रिषभ पंत (भारत, यष्टिरक्षक), जेसन होल्डर (वेस्ट इंडिज), नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया), जसप्रित बुमराह (भारत), कगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), मोहम्मद अब्बास (पाकिस्तान)

आयसीसी एकदिवसीय संघ:- विराट कोहली (भारत, कर्णधार), रोहित शर्मा (भारत), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), जो रुट (इंग्लंड), रॉस टेलर (इंग्लंड), जोस बटलर (इंग्लंड, यष्टिरक्षक), बेन स्टोक (इंग्लंड), मुस्तफिजुर रेहमान (बांग्लादेश), कुलदिप यादव (भारत), रशिद खान (अफगानिस्तान), जसप्रित बुमराह (भारत)

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *