कर्णधार वेड आणि डार्सी शॉर्टच्या नाबाद अर्धशतकच्या जोरावर होबार्ट हरीकेन्सचा एडिलेड स्ट्राईकरवर विजय

२०१८-१९ च्या बिग बॅश लीग मधील आतापर्यंत झालेल्या सामन्यांत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या होबार्ट हरीकेन्सचा सामना होता तो सत्रात सरासरी कामगिरी केलेल्या कॉलिन इंग्रामच्या नेतृत्वात खेळणाऱ्या एडिलेड स्ट्राईकरविरुद्ध.

कॉलिन इंग्रामने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण रीले मेरेडीथने दुसऱ्याच षटकांत जेक वेदराल्डला बाद करत स्ट्राईकर्सला पहिला धक्का दिला. पहिला गडी बाद झाल्यानंतर कॅरी (२८) आणि मॅथ्यु शॉर्ट (१३) स्ट्राईकर्सचा डाव सावरत आहेत असे दिसत असतानाच जोफ्रा आर्चरने शॉर्टला तर फॉकनरने कॅरीला बाद करत स्ट्राईकर्सची अवस्था ९.२ षटकांत ३ बाद ५० केली होती.

तीन गडी गमावल्यानंतर संघाची जिम्मेदारी कर्णधार कॉलिन इंग्राम आणि जोनाथन वेल्सवर आली होती. हरीकेन्ससमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी फॉर्ममध्ये असलेल्या इंग्रामने मैदानात टिकणे आवश्यक होते. इंग्राम चांगल्या लयीत दिसत होता त्यामुळे त्याला चांगल्या साथीची आवश्यक होती आणि तीच साथ वेल्सने इंग्रामला दिली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ६६ धावांची भागिदीरी केली. वेल्स २६ चेंडूत २८ धावा काढुन बाद झाल्यानंतर रशिद खानही पुढच्याच षटकांत बाद झाला. रशिद खान बाद झाला तेव्हा स्ट्राईकर्सने १७.५ षटकांत ५ गडी गमावत १२३ धावा केल्या होत्या. शेवटच्या १३ चेंडूत स्ट्राईकर्सचा संघ किती धावा काढतो याकडे सर्वांचे लक्ष होते पण इंग्रामने वॅलिंटोसोबत नाबाद ३१ धावांची भागिदारी करत संघाला १५४ पर्यंत पोहचवले. स्ट्राईकर्सडुन कर्णधार कॉलिन इंग्रामने सर्वाधिक नाबाद ६७ धावांची खेळी केली. हरीकेन्सकडुन जोफ्रा आर्चर आणि जेम्स फॉकनरने प्रत्येकी २ तर रिले मेरेडीथने १ गडी बाद केला.

१५५ धावांच आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हरीकेन्सने धडाक्यात सुरुवात करत पहिल्या ६ षटकांत कर्णधार मॅथ्यु वेड आणि डार्सी शॉर्टने बिनबाद ४९ धावा केल्या होत्या. ३२ चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या मॅथ्यु वेडनने विजयाचा पाया रचला होता. वेड आणि शॉर्टच्या जोडीने बिली स्टॅनलेक, रशिद खानचा चांगलाच समाचार घेतला. १२ व्या षटकांत हरीकेन्सने १०० चा टप्पा गाठला आणि १६.५ षटकांत हरीकेन्सने १० गड्यांनी विजय मिळवत गुणतालिकेत प्रथम स्थान कायम राखले. हरीकेन्सकडुन मॅथ्यु वेडने नाबाद ७४ तर डार्सी शॉर्टने नाबाद ७३ धावांची खेळी केली. पहिल्या गड्यासाठी वेड आणि शॉर्टने नाबाद १५८ धावांची भागिदारी करत २०१८-१९ च्या सत्रातील सर्वात भागिदारीचा विक्रम आपल्या नावे केला. नाबाद ८४ धावांची खेळी केलल्या मॅथ्यु वेडला सामनावीर पुरस्काराने पुरस्काराने गौरविण्यात आले.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *