इंग्लड लायन्सविरुद्धच्या मालिकेसाठी रहाणे, पंत करणार भारत अ संघाच प्रतिनिधित्व

इंग्लड लायन्सचा संघ २३ जानेवारी ते १६ फेब्रुवारी दरम्यान भारत अ विरुद्ध ५ एकदिवसीय आणि दोन ४ दिवसीय सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येत आहे. एकदिवसीय सामने तिरुअनंतपुरमच्या ग्रिन फिल्ड आंतरराष्ट्रीय मैदानावर तर चार दिवसीय सामने वायनाड आणि मैसुर येथे खेळवण्यात येणार आहेत. एकदिवसीय आणि चार दिवसीय सामन्यांआधी होणाऱ्या दोन दिवसीय सराव सामन्यासाठी अध्यक्षीय संघाची निवड करण्यात आली. एकदिवसीय सामन्यांतील पहिल्या ३ सामन्यांसाठी अजिंक्य रहाणेची कर्णधारपदी नेमणुक केली तर उर्वरित दोन सामन्यांसाठी महाराष्ट्राच्या अंकित बावणेकडे भारत अ चे नेतृत्व सोपवले आहे.

      इंग्लड लायन्सविरुद्धची मालिका अजिंक्य रहाणेसाठी पुन्हा एकदा एकदिवसीय संघात परतण्यासाठी चांगली संधी असेल. फेब्रवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रहाणे शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. शेवटच्या १७ एकदिवसीय सामन्यांत रहाणेनी १शतक आणि ८ अर्धशतकाच्या सहाय्याने ४८.३३ सरासरीने  ७२५ धावा काढल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा एकदिवसीय संघात परतण्यासाठी रहाणे आतुर असेल. भारताच्या कसोटी संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतची ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात वर्णी लागली नाही पण न्युझिलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पंतची निवड करण्यात आली आहे त्यामुळे न्युझिलंडला जाणापुर्वी चांगली कामगिरी करण्यास पंत उत्सुक असेल.

      पंतला विश्रांती देण्यासाठी त्याची ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान दिले नाही असे निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद यांनी सांगितले तसेच रिषभ पंत निश्चितच विश्वचषकाच्या योजनेचा हिस्सा असु शकतो असे प्रसाद यांनी सांगितले. पहिल्या तीन सामन्यांसाठी क्रृणाल पांड्याची निवड करण्यात आली आहे त्यानंतर तो न्युझिलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळण्यासाठी न्युझिलंडला रवाना होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारी, रणजी स्पर्धेत महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या सिद्धेश लाडला दोन एकदिवसीय सामन्यांसोबतच अध्यक्षिय संघात स्थान मिळाले तर रिंकु सिंग, सौरभ कुमार, अनिकेत चौधरी, अंकित राजपुत आणि प्रियम गर्गला अध्यक्षिय संघात स्थान मिळाले.

संघ पुढीलप्रमाणे:

पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी:

अजिंक्य रहाणे (कर्णधार), अनमोलप्रित सिंग, रितुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, अंकित बावणे, इशान किशन (यष्टिरक्षक), क्रृणाल पांड्या, अक्षर पटेल, मयंक मार्कंडे, जयंत यादव, सिद्धेश कौल, शार्दुल ठाकुर, दिपक चाहर, नवदिप सैनी

शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी:

अंकित बावणे (कर्णधार), अनमोलप्रित सिंग, रितुराज गायकवाड, रिकी भुई, सिद्धेश लाड, हिम्मत सिंग, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दिपक हुड्डा, अक्षर पटेल, राहुल चाहर, जयंत यादव, नवदिप सैनी, आवेश खान, दिपक चाहर, शार्दुल ठाकुर

दोन दिवसीय सराव सामन्यासाठी अध्यक्षिय संघ:

इशान किशन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अक्षत रेड्डी, ध्रुव शौर्य, रिकी भुई, सिद्धेश लाड, रिंकु सिंग, प्रियम गर्ग, सौरभ कुमार, राहुल चाहर, जयंत यादव, अनिकेत चौधरी, अंकित राजपुत, राजेश मोहंती 

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *