पाकिस्तानला विजयासाठी ३८१ धावांचे लक्ष्य

पाकिस्तानला विजयासाठी ३८१ धावांचे लक्ष्य, तीसऱ्या दिवसअखेर पाकिस्तान ३ बाद १५३

दुसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेचा संघ ५ बाद १३५ अशा स्थितीत होता आणि हाशिम अमला ४२ तर क्विंटन डी कॉक ३४ धावांवर खेळत होते. या दोघांवर आफ्रिका संघाची जिम्मेदारी होती. त्यामुळे तीसऱ्या दिवशी या दोघांकडुन चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. दोघांचाही चांगलाच जम बसला होता. बघता – बघता या दोघांनी सहाव्या गड्यासाठी १०२ धावांची भागिदारी केली आणि ही भागिदारी पाकिस्तानसाठी धोकादायक ठरताना दिसत होती पण हसन अलीने हाशिम अमलाला ७१ धावांवर सरफराज अहमदकरवी झेलबाद करत दक्षिण अफ्रिकेला सहावा धक्का दिला.   

      अमला बाद झाल्यानंतरही डी कॉकने एक बाजू लावुन धरली होती. त्याने वेरॉन फिलॅंडरसोबत ७ व्या गड्यासाठी २८ तर कागिसो रबाडासोबत ८ व्या गड्यासाठी ७९ धावांची मह्त्त्वाची भागिदारी केली. यासोबतच डी कॉकने कसोटी कारकिर्दीतले ४ थे शतक झळकावत १३८ चेंडूत १२९ धावांची खेळी केली. १४ चेंडूत शेवटचे ३ गडी गमावल्याने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव ३०३ धावांत संपुष्टात आला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी ३८१ धावांचे आव्हान ठेवले. आफ्रिकेकडुन हाशिम अमलाने ७१ तर क्विंटन डी कॉकने १२९ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडुन शादाब खान आणि फहीम अश्रफने प्रत्येकी ३, मोहम्मद अमीरने २ तर मोहम्मद अब्बास आणि हसन अलीने प्रत्येकी १ गडी बाद केला.

      चौथ्या डावात ३८१ धावांचे आव्हान तसे कोणत्याही परिस्थित सोपे नसते आणि मागील पाच डावातील पाकिस्तानची कामगिरी पाहता फक्त एकदाच पाकिस्तानने दोनशे धावांचा टप्पा पार केला होता. त्यामुळे ३८१ धावांच्या आव्हानाला पाकिस्तानी फलंदाज कसे सामोर जातात याकडे सर्वांचे लक्ष होते आणि सर्वात मोठी जिम्मेदारी होती ती सलामीवीरांवर. इमाम – उल – हक (३५) आणि शान मसुद (३७) ने सावध सुरुवात करत भागिदारी वाढवण्यावर भर दिला. डेल स्टेनने इमाम – उल – हकला ३५ धावांवर क्विंटन डी कॉककरवी झेल बाद करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला तेव्हा पाकिस्ताने दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या होत्या त्यानंतर स्टेनने शान मसुदला ३७ धावांवर बाद करत पाकिस्तानची अवस्था २ बाद ७४ केली होती.

      चांगल्या सुरुवातीनंतर झटपट दोन गडी गमावल्याने पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला होता त्यामुळे पाकिस्तानचा डाव सांभळण्याची जिम्मेदारी अझर अली आणि असद शफीकवर आली होती. पण १५ धावांची खेळी केल्यानंतर अझर अली ओलिवियरच्या गोलंदाजीवर क्विंटन डी कॉककडे झेल देऊन परतला. तीसऱ्या दिवसाची अजुन १० षटके बाकी त्यामुळे दिवसाची शेवटची षटके खेळुन काढण्यावर असद शफीक आणि बाबर आझमने भर दिला आणि त्यात ते यशस्वी ठरले. दिवसअखेर पाकिस्तानने ३ गडी गमावत १५३ धावा केल्या, असद शफीक ४८ तर बाबर आझम १७ धावांवर खेळत होते. दक्षिण आफ्रिकेकडुन डेल स्टेनने २ तर ओलिवियरने १ गडी बाद केला. पाकिस्तानला विजयासाठी अजुन २२८ धावांची आवश्यकता आहे तर त्यांचे अजुन ७ गडी बाकी आहेत. पाकिस्तानला विजय मिळवायचा असेल तर असद शफीक, बाबर आझम आणि सरफराज अहमदला मोठी खेळी खेळायला लागेल हे मात्र नक्की. तर डेल स्टेन, वेरॉन फिलॅंडर, ओलिवियर आणि कागिसो रबाडावर दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्याची जिम्मेदारी असेल.

शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *