केरळची उप-उपांत्य फेरीत

२९७ धावांचा यशस्वी पाठलाग करत केरळची उप-उपांत्य फेरीत धडक

   उप-उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी हिमाचल प्रदेश आणि केरळला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यांत विजय आवश्यक होता. विजय मिळवण्याच्या हेतुनेच दोन्ही संघ मैदानात उतरले होते. केरळचा कर्णधार सचिन बेबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला झटपट गडी गमावल्यानंतर अंकित कालसी (१०१) आणि राघव धवन (५८) ने संघाला पहिल्या डावात २९७ धावा करण्यात महत्त्वाची भुमिका निभावली. २९७ धावांना प्रत्युतर देताना सलामीवीर जगदिशच्या रुपाने केरळला पहिला धक्का बसला पण त्यानंतर पुन्नम राहुल (१२७) ने एक बाजू लावुन धरत छोट्या भागिदारी केल्या आणि संजु सॅमसन (५०) सोबत सहाव्या गड्यासाठी १३२ धावांची भागिदारी केली.

     एक वेळ ५ बाद २६८ अशा सुस्थितीत असताना केरळचा संपुर्ण डाव २८६ धावांत आटोपला. १८ धावांत ५ गडी गमावल्याने केरळचा संघ पहिल्या डावात ८ धावांनी पिछाडीवर पडला. दुसऱ्या डावाच्या सुरुवातीपासुनच हिमाचल प्रदेशच्या फलंदाजांनी झटपट धावा करण्यास सुरुवात केली होती. ३५ धावांच्या सलामीनंतर पहिल्या डावातील शतकवीर अंकित कालसी (६४) आणि रिषी धवन (८५) ने तीसऱ्या गड्यासाठी १०६ धावांची भागिदारी केली आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशने ८ गडी गमावत २८५ धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि सर्वांना आश्चर्यचकित केले.

     २९७ धावांच आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केरळच्या सलामीवीरांनी ३२ धावांची सलामी दिली पण त्यानंतर सलामीला बढती दिलेल्या विनुप मनोहरम (९६) ने सिजोमोन जोसेफ (२३) सोबत दुसऱ्या गड्यासाठी ७३ धावांची तर कर्णधार सचिन बेबी (९२) सोबत तीसऱ्या गड्यासाठी १०१ धावांची भागिदारी केली पण दोन धावांत दोन गडी गमावल्यानंतर केरळचा संघ अडचणीत सापडला होता. झटपट दोन गडी गमावल्यानंतर कर्णधार सचिन बेबीने संजु सॅमसनला साथीला घेत ८८ भागिदारी केली आणि संघाला विजयाजवळ पोहचवले. ५३ चेंडूत ६१ धावांची नाबाद खेळी करत संघाला ५ गड्यांनी विजय मिळवून दिला आणि या विजयासह केरळने सलग दुसऱ्या वर्षी संघाला उप-उपांत्य फेरीत केरळचा सामना गुजरातविरुद्ध १५ ते १९ जानेवारी दरम्यान वायनाड, केरळ येथे खेळवला जाईल.

रणजी ट्रॉफी २०१८-१९

उप-उपांत्य सामने

१५ ते १९ जानेवारी २०१९

१) विदर्भ वि. उत्तराखंड, नागपुर

२) सौराष्ट्र वि. उत्तर प्रदेश, लखनऊ

३) कर्नाटक वि. राजस्थान, बॅंगलोर

४) केरळ वि. गुजरात, वायनाड, केरळ

— शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *