दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात २६२ धावा, दिवसअखेर पाकिस्तान २ बाद १७

     मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानला व्हाईटवॉश देण्याच्या इराद्याने तीसऱ्या कसोटीत उतरणार होता तर मालिकेचा शेवट गोड करण्याच्या तयारीत होता. षटकांची गती न राखल्याने फाफ ड्यु प्लेसिसवर एक सामन्याची बंदी घातली होती त्यामुळे डिन एल्गार आफ्रिका संघाचे नेतृत्व करणार होता. फाफ ड्यु प्लेसिसच्या जागी युवा फलंदाज हमझाला पदार्पणाची संधी मिळाली. डिन एल्गारने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

     दुसऱ्याच षटकांत मोहम्मद अब्बासने कर्णधार डिन एल्गारला बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला पण त्यानंतर सलामीवीर मार्कम (९०) आणि हाशिम अमला (४१) ने दुसऱ्या गड्यासाठी १२६ धावांची भागिदारी केला आणि आफ्रिका मोठ्या धावसंख्येकडे आगेकुच करत होती. २० धावांत मार्कम आणि अमला बाद झाल्यानंतर डी ब्र्युन (४९) आणि पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या झुबैर हमझाने ४१ धावांची खेळी करत चौथ्या गड्यासाठी ७५ धावांची भागिदारी केली. ३ बाद २२९ अशा सुस्थितीत असताना आफ्रिकेचा डाव २६२ धावांत संपुष्टात आला. आफ्रिकेकडुन मार्कम, अमला, डी ब्र्युन आणि झुबैर हमझाने महत्त्वाच्या खेळी केल्या तर पाकिस्तानकडुन फहीम अश्रफने सर्वाधिक ३, मोहम्मद अमीर, मोहम्मद अब्बास आणि हसन अलीने २ तर शादाब खानने १ गडी बाद केला.

     पाकिस्तानने आफ्रिकेला पहिल्या डावात २६२ धावांत गुंडाळल्याने पाकिस्तानने सामन्यांवर वर्चस्व निर्माण केले होते. गोलंदाजांच्या कामगिरीनंतर पाकिस्तानला फलंदाजांकडुनही अशाच कामगिरीची अपेक्षा होती. पहिल्या दिवसाच्या खेळातील काही षटके पाकिस्तानला खेळुन काढायची होती. पण चौथ्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर वेरॉन फिलॅंडरने शान मसुद (२) आणि अझर अलीला डी कॉककरवी झेल बाद करत पाकिस्तानची अवस्था २ बाद ६ केली होती. दिवसअखेर पाकिस्तानची अवस्था ७ षटकांत २ बाद १७ अशी झाली होती तर इमाम उल हक १० धावांवर तर मोहम्मद अब्बास शुन्यावर नाबाद होते. दुसऱ्या दिवशी इमाम उल हक, असद शफीक, बाबर आझम आणि कर्णधार सरफराज अहमदवर फलंदाजीची जिम्मेदारी असेल.

— शंतनु कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *