२०१९ ची आयपीएल भारतातच होणार!!!

२०१९ ची आयपीएल भारतातच होणार, २३ मार्चला चैन्नईत होणार सुरुवात

लोकसभा निवडणुकांमुळे २००९ ची संपुर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळविण्यात आली होती तर २०१४ च्या सत्रातील सुरुवातीचे काही सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल – मे दरम्यान होणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलचे १२ वे सत्र भारताबाहेर खेळविण्यात येईल असेच वाटत होते आणि काही दिवसांपासुन दक्षिण आफ्रिका व संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल सत्र खेळविण्याबाबत विचार होत होता. पण ८ जानेवारी रोजी बीसीसीआयने घोषणा केली की “आयपीएलचे १२ वे सत्र पुर्णपणे भारतातच खेळविण्यात येणार आणि याची सुरुवात २३ मार्च पासुन चैन्नईत होणार आहे”.

एरवी आयपीएल स्पर्धा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होऊन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपते. पण लोकसभा निवडणुकांबरोबरच यावर्षी इंग्लंडमध्ये ३० मे –  १४ जुलै दरम्यान विश्वचषक खेळवला जाणार आहे आणि  जस्टीस लोढा समितीच्या निर्णयानुसार आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कमीत कमी १५ दिवसांच अंतर आवश्यक आहे. त्यामुळे १५ मे पर्यंत आयपीएल स्पर्धा संपायला हवी म्हणून स्पर्धेला मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होणे आवश्यक होते.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला स्पर्धेचं संपुर्ण वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. चैन्नई, मुंबई, राजस्थान, कोलकत्ता, मोहाली, बॅंगलोर, दिल्ली आणि हैद्राबाद या आठ मैदानाबरोबरच बीसीसीआयने आठ मैदानांना पर्याय म्हणून चार ते सहा मैदानांची निवड केली आहे.

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर स्थळामध्ये बदल करावा लागु शकतो म्हणून बीसीसीआयने पर्यायांची निवड केली आहे. आयपीएलने अंतिम सामन्याची तारीख जाहीर केली नाही पण बहुतेक अंतिम सामना मे सामन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खेळवला जाऊ शकतो. या सत्रात फ्रॅंचाइजीसमोर सर्वात मोठे आव्हान असेल कारण आयपीएलचे सत्र संपल्यानंतर १५ दिवसांनी विश्वचषकाला इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे त्यामुळे सत्राच्या अंतिम पर्वात परदेशी खेळाडु उपलब्ध नसतील याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होईल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *