पु.ल.देशपांडे व्यक्ती कि वल्ली !

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांच्याबद्दल  माहिती नाही असा एक पण मराठी माणुस सापडणार नाही. साहित्य, संगीत, चित्रपट, नाटक आणि संसारात राहूनही त्यांचा स्थायीभाव असलेल्या अवलिया स्वभावाने ते साधले. त्यामुळे या लाडक्या “भाई”चे पडद्यावरचे दर्शन म्हणजे त्यांच्या गतकाळाचा पुनर्प्रत्ययाचा आनंद आहे. 

“भाई” ‘व्यक्ती की वल्ली’ हा माहितीपट, चित्रपट, चरित्रपट किंवा व्यक्तिचित्रणाच्या पठडीत बसणारा नाही. हा एवढा मोठा माणूस, इतका मोठा कलाकार प्रत्यक्षात किती साधा होता, किती आम होता, किती निर्विष होता आणि किती अश्राप होता ही गोष्ट आपल्याला भिडते. सगळ्या गोष्टीत आनंद बघण्याची त्याची दृष्टी किती निरागस होती त्याचे आपल्याला दर्शन घडते आणि आपल्याला वाटतं पु.लं आपल्याला समजले.

पु.ल देशपांडेंवर आजपर्यंत कित्येक नाटके, माहितीपट, पुस्तक, मालिका झाल्या आहेत, पण हा ‘भाई’ जरा वेगळा आहे हे नक्की. या चित्रपटाची खासियत म्हणजे तो एका स्वप्नमयी काळाशी जोडलेला आहे. मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या ‘गोल्डन पिरेड’ मध्ये पु.ल आणि वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, राम गबाले आदींसोबत पाहणे ही एकमोठी मेजवानी आहे.

या चित्रपटातील सर्वात मोठा वाटा म्हणजे ‘पु.ल’ यांची भूमिका साकारणाऱ्या सागर देशमुख याचाच आहे. पु.लंचे विनोद आणि यातील इतके लोक येतात आणि जातात ते का याचाही काहीसा कंटाळा येऊ शकतो पण ते घडत नाही हे त्या कलाकारांचा विजय! कलादिग्दर्शन जरा नाटक बसवतात तसा झालाय पण पु.लंचा विनोद त्याला मारून जातो!

तूर्तास पु.ल यांना अनुभवण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवाच!

निर्माता : महेश मांजरेकर, अविनाश अहाले, वैभव पंडित, महेश पटेल, वीरेंद्र उपाध्ये 

दिग्दर्शक : महेश मांजरेकर, 

पटकथा : गणेश मतकरी, 

संवाद : रत्नाकर मतकरी, 

संगीत : अजित परब 

संकलन : अभिजीत देशपांडे 

कला निर्देशन : प्रशांत राणे 

छायाचित्रण : करण रावत 

रंगभूषा : विक्रम गायकवाड 

कलाकार : सागर देशमुख, इरावती हर्षे, पद्मनाभ भिंड, अजय पूरकर, सचिन खेडेकर, विद्याधर जोशी, विना जामकर व इतर.

या सिनेमाला अमी देतोय :४.५/५

8 thoughts on “पु.ल.देशपांडे व्यक्ती कि वल्ली !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *