मुंबईचा संघ साखळीतच गारद!

४२ वेळेचा रणजीविजेता मुंबईचा संघ साखळीतच गारद

८५ व्या रणजी सत्राची सुरुवात मुंबईसाठी निराशजनकझाली होती. मुंबईने खेळलेल्या पहिल्या ६ सामन्यांपैकी ५ सामने अनिर्णित राहिले होते तर गुजरात विरुद्ध मुंबईला ९ गड्यांनी पराभव स्विकारावा लागला. ७ व्या सामन्यांत मुंबईचा सामना होणार होता तो गतविजेता विदर्भाशी. या सामन्यांत मुंबईला विजय आवश्यक होता. विदर्भाचा कर्णधार फैज फजलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाचव्या षटकांत फजल बाद झाल्यानंतर मुंबईचा माजी कर्णधार आणि सध्या विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वासिम जाफरने आधी अथर्व तायडे (९५)सोबत दुसऱ्या गड्यासाठी १९९ धावांची आणि गणेश सतीश (९०) सोबत तीसऱ्या गड्यासाठी ११२ धावांची भागिदारी रचत मोठ्या धावसंख्येचा पाया रचण्यात महत्त्वाची भुमिका बजावली.

वासिम जाफरने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५१ वे शतक झळकावत १९६ चेंडूत १७८ धावांची खेळी केली आणि विदर्भाचा डाव ५११ धावांत संपुष्टात आला.

पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारल्याने सामन्यांवर विदर्भाचे वर्चस्वहोते यात दोनच निकाल अपेक्षित होते एक म्हणजे विदर्भाचा विजय किंवा सामना अनिर्णितराहण्याचा. पहिल्या डावात जय बिश्ट (६४), ध्रुमिल मतकर (६२*) आणि शुभम रांजणे (५२) यांनी काही  प्रमाणात प्रतिकार केला आणि मुंबईचा पहिला डाव २५२ धावांत संपुष्टात आला.विदर्भाचा कर्णधार फैज फजलने मुंबईला फॉलोऑन देत पुन्हा एकदा फलंदाजीस पाचारण केलेपण दुसऱ्या डावात मुंबईच्या फलंदाजांनी विदर्भाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले आणि मुंबईचा दुसरा डाव फक्त ११४ धावांत संपुष्टात आला.          

  २०१८-१९च्या विजय हजारे चषकाचा विजेता मुंबईचा हा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील डावाच्या फरकाने तीसरा मोठा पराभव होता. ७ सामन्यांत फक्त ११ गुण पटकावल्याने मुंबईचेआव्हान साखळीतच गारद झाले. मुंबईकडुन फलंदाजीत सिद्धेश लाड (६५२), शिवम दुबे (६०४)तर गोलंदाजीत शिवम दुबे (२१) आणि रोयस्टन डायस (१३) यांनी महत्त्वाची कामगिरी केली पण या सत्रात मुंबईला पृथ्वी शॉची कमतरता भासली तसेच भारत अ संघाचे प्रतिनिधित्वकरणाऱ्या श्रेयस अय्यर फक्त ३ सामने खेळु शकला आणि दुखापतीमुळे शार्दुल ठाकुर या सत्रातफक्त १ तर धवल कुलकर्णी फक्त ३ सामने खेळु शकला याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला आणि मुंबईचा संघ साखळीतच गारद झाला.

छत्तीसगडविरुद्ध होणारा साखळीतील शेवटचा सामना जिंकुन शेवट गोड करण्याचा मुंबई संघाचा प्रयत्न असेल.

— शंतनु कुलकर्णी

10 thoughts on “मुंबईचा संघ साखळीतच गारद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *