झीरो ते हिरो ते परत झिरो!

शाहरुख खान म्हणजे रोमान्सचा राजा, बादशहा, किंग इतकं! पण अलीकडचा काही काळात  शाहरुख खान आणि त्याचा स्टारडम कमी होत आहे असा वाटतं. त्याचे कारण म्हणजे गेल्या ३ वर्षात त्याचे आलेले सिनेमे जसे चालायला हवे तसे चालत नाहीत असं दिसतंय. याची 
सुरवात झाली ते त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाला पार्टीत त्याचा काही असहिष्णुविधानावरून असो !त्या गोष्टी जाऊ दे.

‘झिरो’ जर हिट ठरला नाही तर कदाचित मला पुढील सहा ते दहा महिने काम मिळणार नाही, 

असं शाहरुख काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाला होता. 

त्याच्या सारख्या सुपरस्टारच्या डोक्यात हा विचार का बरं आला असेल याचं उत्तर ‘झिरो’ 
पाहिल्यावर मिळतं. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा चित्रपट हे कथानकावर नाही तर  त्यात काम करणाऱ्या हिरोच्या स्टारडमवर चालायचे, सुपरहिट व्हायचे. 
मात्र आता तो काळ गेला. प्रेक्षकांची आवड आता बदलत चालली आहे. प्रेक्षक हे चांगला आशय  असणाऱ्या चित्रपटाच्याशोधात असतात आणि याच आशयची कमतरता ‘झिरो’ मध्ये आहे.

शाहरुख, अनुष्का, कतरिना अशी तगडी स्टारकास्ट असतानाही या चित्रपटात बऊआची ‘जादू’  चालल्यासारखं वाटतं नाही. ‘झिरो’त रोमँटिक हिरो शाहरुखनं साकारलेली भूमिका ही त्यानं साकारलेल्या इतर  भूमिकेपेक्षा खूपच वेगळी आहे. शाहरूख या चित्रपटात काहीतरी वेगळं 
करतोय त्यामुळे चाहत्यांना त्याच्या ‘झिरो’कडून फार अपेक्षाही आहे. मात्र ‘झिरो’ हा प्रेक्षकांची पूर्णपणे निराशा करणारा चित्रपट आहे असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही.

गोष्ट काय

मेरठमध्ये राहणारा बऊआ सिंग म्हणजेच शाहरुख शारीरिक व्यंग घेऊन जन्माला आलाय. पण याचं दु:ख करत बसणाऱ्यापैकी तो नाही. मित्रांसोबत टवाळक्या करणं, वडिलांच्या जीवावर मज्जा 
करणं आणि त्याची सर्वात आवडती अभिनेत्री बबिता कुमारी (कतरिना कैफ)सोबत रोमान्स  करण्याची स्वप्न रंगवणं यात ३८ वर्षांचा बऊआचं आयुष्य छान जात असतं.सारं काही सुरळीत सुरू असताना चांगल्या मुलीशी लग्न करुन संसार थाटण्याचं भूतही ४ फूट २ इंच बऊआच्या डोक्यात  थैमान घालू लागतं. ‘बऊआ सिंग’ हे पात्र साकारणारा शाहरुख पूर्वार्धात प्रेक्षकांना हसवतो, तो प्रेम
करण्याची किंबहुना प्रेमाचं नाटक करण्याची त्याची चालाखी दाखवून देतो, श्रीमंत वडिलांच्या 
पैशांच्या जीवावर मजा करतो, पैसे उधळतो.

झिशान आयुब हा शाहरुखच्या मित्राच्या भूमिकेत दिसत असून, त्याने साकारलेला ‘गुड्डू’ हा मित्र पाहता, दोस्त असावा तर असा असंच म्हणावं लागतं. अनुष्काने साकारलेली ‘आफिया’ ही प्रभावी 
वाटते. 

प्रेक्षकांसाठी खास आकर्षण आहे ते म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी. ‘मिस हवाहवाई’ची एक अखेरची झलक या चित्रपटातून दिसत आहे.

शेवट सांगायचे झाले तर, बुटक्या व्यक्तीच्या रुपात किंग खानला पाहण्यासाठी आणि त्याच्या 
चाहत्यांसाठी हा चित्रपट एकदा पाहावा असा आहे. शाहरुख खान चा स्पेसिअल इफेक्ट्स अँड व्ही.एफ.एक्स. मध्ये  भारी वाटतो. असो, शेवटी मी शाहरुख चा जबर फॅन आहे 
म्हणून त्याच्या सिनेमाचे जास्त विश्लेषण  करू शकत नाही कारण काहीही असो शाहरुख हा शाहरुख आहे! पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त !!!

2 thoughts on “झीरो ते हिरो ते परत झिरो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *