पॅनकार्ड वापरताय ??? आधी हे जाणून घ्या.

कुठलेही आर्थिक व्यवहार करण्यासाठी किंवा कर भरण्यासाठी पॅनकार्डची गरज लागते. पॅनकार्ड हे महत्वाचे ओळखपत्रच आहे. पण अशा कार्डच्या नियमावलीत मोठे बदल करण्यात आले आहेत, व ते या ५ डिसेंबर पासून ते लागू सुद्धा होणार आहेत. काय आहेत ते नियम बघूया खाली.

  • कर चुकवेगिरी रोखणायसाठी पॅनकार्डचे काही नियम बदलण्यात येत आहेत. केंद्रीय प्रत्यक्षकर मंडळाने नवीन नियमावली सादर केली आहे.  यानवीन नियमांनुसार अडीच लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे व्यवहार करणाऱ्या आर्थिक संस्थेसाठी पॅनकार्ड अनिवार्य असेल. अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची देवाण-घेवाण करणाऱ्या व्यक्तीला ३१ मे २०१९ अगोदर पॅनकार्डसाठी अर्ज करावा लागेल.
Image result for pan card wiki
  • संचालक, व्यवस्थापकीय संचालक, भागीदार, ट्रस्टी, लेखक, संस्थापक, कर्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), मुख्य अधिकारी या पदाधिकाऱ्यांकडे पॅनकार्ड नसल्यास त्यांनी ३१ मे २०१९ पर्यंत पॅनकार्डसाठी अर्ज करणे अनिवार्य आहे.  या नियमांनुसार निवासी संस्थांसाठीही पॅन कार्ड आवश्यक असेल.
  • आर्थिक वर्षादरम्यान संस्थेची एकूण उलाढाल, व्यवहार पावती ५ लाखांपेक्षा अधिक नसेल, तरी देखील पॅनकार्ड क्रमांक द्यावा लागेल. यामुळे प्राप्तिकर विभागाला व्यवहारांचे परीक्षण करणे सोपे जाणारआहे. यामुळे कर चुकवेगिरी रोखण्यासाठी मोठी मदत होणारआहे.
  • नवीन पॅनकार्डच्या अर्जातही प्राप्तिकर विभागाने काही बदल केले आहेत. पॅनकार्ड अर्जादाराची आई ही एकल माता असेल तर यापुढे संबंधित अर्जात वडिलांचं नाव नमूद न करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे भविष्यात वडिलांच्या नावाचा उल्लेख नसलेली पॅनकार्ड दिसू शकतील.

(स्रोत – पीटीआय) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *