संकष्टी चतुर्थी म्हणेज नक्की काय ते जाणून घ्या !!!

संकष्टी म्हणजे गणेशाची उपासना. गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा देव मानला जातो. हिंदू धर्मात गणेशाची पूजा प्रचलित आहे. कुठले हे महत्वाचे काम सुरु निर्णय पूर्वी आपण गणेशाची पूजा करतो. संकष्टी चतुर्थी  ही गणेशाची उपासना.

हिंदू प्रथेनुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी चतुर्थी म्हणतात . एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास असलास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीचा ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. या दिवशी गणेश उपासनेला महत्व आहे.

संकष्टी चतुर्थीला व्रत केले जाते स्त्री असो किंवा पुरुष हे व्रत करतात. या दिवशी दिवस भर उपवास करून संधयाकाळनंतर चंद्रोदय झाल्यानंतर गणपतीला नेवैद्य दाखवून भोजन केले जाते. अर्थात गणपतीचे नेवैद्य म्हणजे मोदकच!  सहसा दिवसा उपवास वेळेत साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट्याची भाजी ग्रहण केली  जाते.

अंगारकी

जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते त्याला अंगारकी म्हणतात. त्यातून पण जी अंगारकी चतुर्थी अधिकमासात येते तिला खूप मानतात कारण ते एकवीस वर्षातून एकदाच येते. साधारण पणे ३ वर्षात ५ अंगारकी येतात आणि ३३ महिनातं १ अधिकमास येतो. म्हणजे २१ वर्षात साधारण ७ अधिकमास येतात पण ७ अधिकमासात मंगळवारी संकष्टी येणाची शक्यता सतत एक असते, म्हणून साधारणपणे २१ वर्षात १ अंगारकी येते.

गणपती बाप्पा मोरया !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *